बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

सहा शब्दांत विज्ञानकथा!

नुकतीच मेघश्रींनी एक लिंक पाठवली. (http://www.wired.com/wired/archive/14.11/sixwords.html) त्यावर हेमिंग्वेच्या सहा शब्दांत लिहिलेल्या कथेवरुन स्फुर्ती घेऊन काही विज्ञानकथा होत्या - अर्थात इंग्रजीत. पहिल्यांदा जरा संशयानेच वाचल्या, कारण आमच्यापैकी काही जणांना शब्दभांडार जवळ घेऊन बसल्याशिवाय मुळी लिहिताच येत नाही! अश्या वेळी आख्खी गोष्ट आणि ती ही केवळ सहा शब्दांत?

पण त्या वाचून पाहिल्यावर साहजिकच कट्ट्यावरच्या मंडळींना खुमखुमी आली - आपणही प्रयत्न करुन बघावा. काही इंग्रजीत आल्या, पण बऱ्याचश्या मराठीत होत्या. त्यांचं हे संकलन.

पहिली कथा आली ती सुनील सुळेंकडून. मुळात सुनील मोजक्या शब्दांत फार मोठा आशय मांडण्यात अतिशय यशस्वी असे लेखक आहेत. तेव्हा पहिली कथा - हो, पूर्ण कथा - त्यांच्याकडून आली यात आश्चर्य ते काय? तेव्हा मंडळी - वाचा आणि मोकळेपणाने तुमच्या प्रतिक्रिया द्या...


They landed, they disguised, they mingled.

- सुनील सुळे.

आणि हो, एव्हाना हे सगळं ज्यामुळे सुरु झालं, त्या हेमिंग्वेच्या प्रसिद्ध कथेबद्दल उत्सुकता वाटत असेल ना? ती वरच्या दुव्यावर आहेच, पण सोयीसाठी इथेही देत आहोत.

"For sale: baby shoes, never worn."

हेमिंग्वे हे त्यांचे सर्वोच्च दर्जाचे लेखन मानायचे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा