E.T. भोवती एका पिढीच्या इंग्रजी चित्रपटाच्या बऱ्याच आठवणी थोडा काळ तरी थबकतात. इतक्या थेटपणे आणि जवळून आपली परग्रहवासियांशी भेट घडवून आणणारा बहुधा हा पहिला चित्रपट. स्टार ट्रेक, स्टार वॉर्स या आणि अश्या मालिका, चित्रपटांमधून मग अविश्वास, कुतूहल, स्वप्नरंजन, आशा अश्या अनेक मार्गांनी आपली विचार- आणि कल्पनाशक्ती प्रवास करु लागली. SETI सारखे उपक्रम परग्रहवासियांच्या शोधात सामान्य माणसालाही सहभागी करुन घेऊ लागले. बहुधा विश्वात आपण एकटे असणार नाही, नाही - नक्की कुठेतरी जीवसृष्टी असेलच ही भावना आशेपासून खात्रीपर्यंत आंदोलने घेते. कदाचित म्हणूनच विज्ञानकथालेखकांचे जे खास आवडीचे विषय आहेत त्यात परग्रहवासी खूप वरच्या क्रमांकावर आहेत.
पण स्मिता पोतनीसांना बहुधा परग्रहवासीयांना शोधायला पृथ्वीही सोडायला लागणार नाही असं वाटतंय का या कथेत? एक उत्तम लेखक केवळ सहा शब्दांत नुसती पूर्ण कथा उभी करत नाही तर त्यात रहस्यकथेचा थरारही आणू शकतो. विरामचिन्हांच्या योग्य उपयोगाबद्दल किंवा त्यांच्या आवश्यकतेबद्दल कुणाला शंका असेलच तर ही कथा वाचा - कारण सहा शब्दांबरोबरच हिच्यातली विरामचिन्हे फार मोठी भूमिका बजावतात! इतकी की त्यातल्या शब्दांबरोबरच एक चिन्ह इकडचं तिकडे झालं तर संपूर्ण कथेचा बाज, परिणाम बदलतो.
भविष्यकाळात डोकावलंत? बघा, आपणच आहोत. एलियन्स?
- स्मिता पोतनीस.